वृत्तरत्न नव महाराष्ट्र
प्रतिनिधी-शंकर गायकवाड
चरीव- गुरुवर्य ह.भ.प. परशुराम दरे यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चरीव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तानाजी घायवट गुरुजी तसेच शिक्षकवृंद उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने गुरुवर्य परशुराम दरे यांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरीव ही तालुक्यात गुणवत्तेच्या दृष्टीने नावाजलेली शाळा असून, ग्रामस्थ व शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे येथील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत उत्तम प्रगती करत आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments