Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे बाबासाहेबांच्या अनुयायांचे भव्य स्वागत! नेशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे अल्पोहार व पाण्याचे वाटप – महामंत्री कॉम. वेणू पी. नायर यांच्या शुभहस्ते उपक्रमाचा शुभारंभ.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

सुनील ठेंगे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील CSMT स्थानकावर नेशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे भीम अनुयायांसाठी मानवसेवेचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शहरात आणि राज्यभरातून CSMT येथे दाखल झालेल्या अनुयायांचे अल्पोहार व पाण्याचे वाटप करून जंगी स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात महामंत्री आदरणीय कॉम. वेणू पी. नायर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. धार्मिक – सामाजिक श्रद्धांजलीसह सामूहिक बुद्धवंदनेने कार्यक्रमाला पवित्र सुरुवात मिळाली.


यानंतर आपल्या प्रबोधनपर भाषणात कॉम. वेणू पी. नायर म्हणाले—

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील प्रत्येकासाठी आहेत. समानता, स्वाभिमान आणि न्याय देणारी त्यांची विचारशक्ती आजही मार्गदर्शक दीप आहे. कामगार, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांना हक्क मिळवून देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले.”


प्रबोधनपर भाषणानंतर CSMT वर आलेल्या सर्व भीम अनुयायांना अल्पोहार आणि पाण्याचे वाटप करून मानवतेचा, समतेचा व बंधुभावाचा संदेश देण्यात आला.



✨ कार्यक्रमात उपस्थिति व योगदान:

कॉम. संदीप जाधव, कॉम. संदीप कुलकर्णी (ECC बँक डायरेक्ट), कॉम. अजय पिल्लं (SBF कमेटी मेंबर), कॉम. सुनिल ठेंगे, कॉम. प्रफुल चंदन शिवे, कॉम. किरण जाधव, कॉम. प्रशांत वाकडे, कॉम. चंद्रकांत निकम तसेच महिला शक्ती यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.


✨ भावपूर्ण गायनातून श्रद्धांजली:

बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आलेल्या महिला भगिनींमध्ये नंदाबाई नामदेव वानखेडे (घाटमोरी, बुलढाणा) व त्यांच्या सहकाऱ्यांनी भावपूर्ण गीत सादर करून कार्यक्रमाला आध्यात्मिक व सांस्कृतिक स्पर्श दिला.


समता – मानवता – बंधुता यांची शिकवण पुन्हा एकदा जागवणारा हा उपक्रम सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरला.



Post a Comment

0 Comments