वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
किन्हवली प्रतिनिधी बाळकृष्ण सोनावणे
विढे :६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रगतशील बौद्ध समाज विढे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान यादव भालेराव यांनी भूषविले.
कार्यक्रमाला विढे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन शांताराम घुडे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक रोठे गुरूजी, गणेश लोहकरे गुरुजी, माधुरी तुंगार मॅडम, जागृती चौधरी मॅडम, सामाजिक कार्यकर्ते राजाराम पांडुरंग भालेराव, पत्रकार विशाल चंदने तसेच शाळेतील विद्यार्थी व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
महान पुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमात "नमो बुद्धाय" व "जय भीम"च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


Post a Comment
0 Comments