वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर, ६ डिसेंबर :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक आणि पावन मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे अभिवादन कार्यक्रम पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात पक्षाचे राज्य सचिव सुरेश शिनगारे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.या वेळी पक्षप्रमुख राजुभाई साबळे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांमुळे मराठवाड्यात ज्ञानाची गंगोत्री वाहू लागली. तळागाळातील आणि वंचित घटकातील मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत नतमस्तक होताना एक विलक्षण ऊर्जा मिळते.”
कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला.
अभिवादन सोहळ्यास पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये राज्य उपाध्यक्ष अँड. अविनाश थिट्टे, राज्य सचिव सुरेश शिनगारे, जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, जिल्हा कार्याध्यक्ष जयनाथ बोर्डे, शहराध्यक्ष रणजित मनोरे, जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक, तसेच प्रदीप धनेधर, विलास साळवे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग होता.


Post a Comment
0 Comments