Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान, पाणी वाटप कार्यक्रम

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकर गायकवाड

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी, मुंबई उपनगरीय रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस ट्रेन मॅनेजर, लोको पायलट व मोटरमन यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला.


७ डिसेंबर रोजी ऑल इंडिया एसटी असोसिएशन रनिंग ब्रॉच वतीने देशातील विविध प्रांतातून चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांसाठी अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

या कार्यक्रमास मध्य रेल्वेचे उच्च स्तरीय अधिकारी DRM Sir, DOM Sir, DEE Sir यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेचे पदाधिकारी बी. के. खोईया, जे. के. आर्या, अमर वाडते, व्ही. के. गौतम, नितीन कांबळे, भास्कर रा. गायकवाड, अमोल कुचेकर, एस. एस. मोरे, राहुल शंभरकर, भुपेंद्र खोईया यांनी कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्टपणे पार पाडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले असून मुंबई, कल्याण, पनवेल येथेही विविध संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडले.




Post a Comment

0 Comments