Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कुऱ्हाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण

कुऱ्हाडी : आज दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न, संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गांवातील कार्यकर्ते, नागरिक आणि बौद्ध उपासक–उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून मानवंदना देण्याने झाली. उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.


या वेळी सदाशिव गणेशराव सरकटे, सुनील इंझे, भगवान चव्हाण, दत्तराव चव्हाण, बंडू चव्हाण, पोलीस पाटील पंकज चव्हाण पत्रकार , प्रल्हाद चव्हाण, भीमराव चव्हाण, महादेव कराळे, अमोल देशमुख, अमोल घुले, भीमराव चव्हाण, धनु घुगे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान सामाजिक ऐक्य, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि प्रगतशील विचारांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच युवकांनी संविधान मूल्यांची जपणूक करून समाज परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.


Post a Comment

0 Comments