वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड
कानडी (ता. शहापूर) जिल्हा परिषद शाळा, कानडी येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शनिवार, दि. 6 डिसेंबर 2025 रोजी भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रगल्भ विचार, सामाजिक सुधारणा, शिक्षणावरील त्यांचा भर आणि संविधान निर्मितीतील मोलाचा सहभाग यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावनांना शब्द देत मनोगते व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरणच मानवी जीवनाचे खरे सार्थक ठरते, याचा पुनः स्मरण करून देत विविध किस्से, उदाहरणे, प्रेरणादायी प्रसंग आणि ऐतिहासिक दाखल्यांच्या माध्यमातून ज्ञानरूपी अथांग सागरास अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



Post a Comment
0 Comments