डोळखांब │ शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५
महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाज क्रांतीचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डोळखांब ग्रामस्थांनी अभूतपूर्व उत्साहाने आणि एकात्मतेने अभिवादन व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. का. संतोष बाळू गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
🌼 अभिवादन व पंचशील गाथा: एकतेचा शक्तीप्रकाश
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहअर अर्पण करून करण्यात आली. पंचशील गाथा वाचनातून बंधुता, समानता आणि न्यायाच्या मूल्यांची पुन्हा एकदा उजळणी करत समाजातील सर्व घटकांनी बाबासाहेबांच्या विचाराशी आत्मीय नाते जोडले. गावातील सर्व समाजाचे ज्येष्ठ बांधव, भगिनी वर्ग आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकतेचे विशेष उदाहरण घालून दिले.
🍽️ पोषणाचा उपक्रम – जिल्हा परिषद शाळेत नाष्टा वाटप
अभिवादन सोहळ्यानंतर जिल्हा परिषद शाळा, डोळखांब येथे उपस्थित सर्वांसाठी नाष्टा वाटपाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक ऐक्याचा संदेश देत या उपक्रमात गावकऱ्यांनी आनंदाने सहभाग नोंदवला.
मानवतेचा संदेश – रुग्णांसाठी ब्लँकेट वाटप
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सरकारी दवाखाना, डोळखांब येथे रुग्णांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. थंडीच्या दिवसात रुग्णांना दिलासा देणारा हा उपक्रम समाजसेवेची जाणीव दृढ करणारा ठरला.
मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती
या सर्व कार्यक्रमांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली :
मा. ज्येष्ठ नेते श्री. शिवाजी भाऊ देशमुख
मा. जाधव गुरुजी
मा. हेमंत वाघचौरे दादा
रंजना देवराम वाघचौरे ताई
माजी उपसरपंच मा. सागर देशमुख
डोळखांब ग्रामपंचायत सरपंच मा. सुरेश मुकणे
डोळखांब सोसायटी चेअरमन झुगरे साहेब
डोळखांब ग्रा.स. सुवर्णा संतोष गायकवाड
माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंत घनगाव
मा. विलास घनगाव
मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय या विचारांवर मार्गदर्शक भाष्य केले.
युवकांचे कौतुकास्पद नियोजन.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी डोळखांब युवक मंडळाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. त्यांची सामाजिक बांधिलकी आणि कार्यतत्परता यामुळेच कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, ग्रामस्थ, भगिनीवर्ग आणि युवकांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण ठेवत पुढील काळातही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रतिष्ठानची प्रेरणादायी भावना व्यक्त करण्यात आली.




Post a Comment
0 Comments