वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कल्याण : आज दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी महामानव, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एन.आर.एम.यु. समन्वय समिती, युवा आघाडी, महिला आघाडी यांच्या वतीने अभिवादन व भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम काॅ. वेणु पी. नायर – महामंत्री मध्य रेल्वे/कोकण रेल्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण रेल्वे स्टेशन – बुकिंग ऑफिस, कोळसेवाडी येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कॉ. वेणु पी. नायर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “सर्व धर्म समभाव” आणि “संविधानिक मार्गाने चालणारी एकमेव युनियन म्हणजे नॅशनल रेल्वे मजदूर युनियन” असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये —
काॅ. रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय),
काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन — मुंबई मंडळ),
काॅ. अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष, मुंबई मंडळ),
काॅ. अमित भगत (सहाय्यक महामंत्री, मुख्यालय),
काॅ. सुहास देशमुख (अध्यक्ष, कल्याण शाखा),
काॅ. सतिशन (शाखा), तसेच NRMU कल्याण शाखेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय सहभाग म्हणून —
काॅ. आनंदा भालेराव (सचिव, पेंशनर फेडरेशन – मुंबई मंडळ),
काॅ. सुनिल ठेंगणे (सचिव OHE डोपो कल्याण),
काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी),
कसारा शाखेतून काॅ. आशोक सोनावणे (खजिनदार),
काॅ. जयवंत वाघमारे (माजी सदस्य, CITU – मुंबई मंडळ),
रेल ठेका मजदूर युनियनचे काॅ. पगारे, काॅ. जितू, काॅ. कोमल सिंग यांसकट अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भिमसैनिकांना भोजन वितरण
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भिमसैनिकांना भोजन वितरणाचे कार्य काॅ. वेणु पी. नायर यांच्या उपस्थितीत पार पडले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, जय संविधान, एन.आर.एम.यु. जिंदाबाद, दुनियाके मजदूर एक हो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडून अभिवादन समारंभ यशस्वीरीत्या संपन्न झाला.




Post a Comment
0 Comments