वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
किन्हवली प्रतिनिधी : बाळकृष्ण सोनावणे
किन्हवली : विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आसनगाव (पूर्व) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील नागरिकांनी एकत्र येत शांतता, अनुशासन आणि सामाजिक सलोखा जपत कॅण्डल मार्चचे आयोजन केले.
हा कॅण्डल मार्च आसनगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचताच, महामानवांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करून मान-वंदना देण्यात आली. उपस्थितांनी आंबेडकरी विचारधारेप्रती निष्ठा जपत त्रिसरण, पंचशील तसेच सरण घेऊन सामाजिक बांधिलकीची पुनःप्रतीज्ञा व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाची आठवण करून देत, समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत समानता, बंधुता आणि न्यायाचे मूल्य पोहोचवण्याचा संदेश दिला. तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आंबेडकरी आंदोलनाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, स्थानिक नागरिक, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅण्डल मार्च आणि वंदनानंतर कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.


Post a Comment
0 Comments