वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
आनंदा भालेराव
कल्याण : नॅरेलमयूचे पूर्व महामंत्री स्वर्गीय कॉ. पी.आर. मेनन यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शुक्रवार दि. 5 डिसेंबर 2025 रोजी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन समन्वय समिती, युवा आघाडी व महिला आघाडी, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
हा उपक्रम काॅ. वेणु पी. नायर, महामंत्री – मध्य रेल्वे/कोकण रेल्वे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली तसेच
काॅ. रसिक मलबारी – कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय,
काॅ. जे.एन. पाटील – मुंबई मंडळ अध्यक्ष, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन
आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन काॅ. रसिक मलबारी यांनी मेनन साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले.
यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले—
> "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. युनियनतर्फे मध्य रेल्वेतील सर्व विभागांमध्ये सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. गरजूंना रक्तपेढीमार्फत वेळोवेळी रक्त उपलब्ध करून दिले जाते."
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये
काॅ. जे.एन. पाटील,काॅ. अरुण मनोरे,काॅ. सतिशन,काॅ. पनीकर,काॅ. सुहास देशमुख,काॅ. अमित भगत
आदींचा समावेश होता. सर्वांनी समाजजागृतीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
तसेच ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशनतर्फे
काॅ. वसंत कासार,काॅ. आनंदा भालेराव,काॅ. प्रकाश सोनोने,काॅ. प्रल्हाद खंदारे,काॅ. दिलीप शिंदे,काॅ. आशोक सोनावने आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
एकूण 48 बाटल्या रक्त संकलित झाल्याने शिबिर यशस्वीपणे पार पडले.
सर्व रक्तदात्यांचे विशेष आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
काॅ. वेणु पी. नायर महामंत्री यांना लाल सलाम!
एन आर एम यु जिंदाबाद!
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन जिंदाबाद!
लाल लाल सलाम! 🚩🚩



Post a Comment
0 Comments