वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
सातारा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) ‘स्वर झंकार संगीत महोत्सव’ आयोजित करण्याच्या निर्णयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये ६ डिसेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम तात्काळ अन्य दिवशी हलवावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशाराच पक्षाने आयोजकांना दिला आहे.
६ डिसेंबर हा आंबेडकरी समाजासाठी अत्यंत पवित्र, शोकाचा आणि भावनांचा दिवस असल्याने या दिवशी कोणताही मनोरंजनात्मक कार्यक्रम घेणे ही भावना दुखावणारी कृती आहे, असे पक्षाने स्पष्ट केले. महापरिनिर्वाण दिनी देशभरातील लाखो नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्यामुळे या दिवशी संगीत महोत्सवाच्या आयोजनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा ठाम विरोध आहे.
पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिंदे साहेब यांना निवेदन देत कार्यक्रमाची तारीख तातडीने बदलण्याची मागणी केली. तसेच, आयोजकांनी आपला निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन करून महोत्सव पूर्णपणे उधळून लावण्याचा इशाराही देण्यात आला.
या वेळी जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे, प्रदीप धनेधर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments