वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
खरीवली केंद्रातर्फे आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरोली (सो) येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती शहापूरचे गटविकास शिक्षणाधिकारी मा. हिरामण वेखंडे सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
खरीवली केंद्रांतर्गत एकूण १३ जिल्हा परिषद शाळा येतात. या सर्व शाळांमधील विद्यार्थी–विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सावरोली शाळा परिवाराने उत्तम व्यवस्था केली होती.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गंगाधर ढमके गुरुजी तसेच सहकारी मा. यशवंतराव गुरुजी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी दुपारच्या भोजनाची उत्तम सोय केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरीवली शाळेचे शिक्षक मा. फुलपगार गुरुजी यांनी प्रभावीपणे केले. स्पर्धा पाहण्यासाठी सर्व शाळांच्या व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण सामने सायंकाळी ४ वाजता संपन्न झाले व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.



Post a Comment
0 Comments