Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*खून किंवा अत्याचार प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या पात्र वारसास* *शासकीय, निमशासकीय नोकरीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन*

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

सोशल मीडिया संपादक मोहन दीपके

सातारा दि. 4- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989 (सुधारित अधिनियम 2015) अंतर्गत जिल्हाधिकारी तथा सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी छाननीअंती केलेल्या शिफारशीनुसार खून किंवा अत्याचार प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र एका वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत कार्यवाही पुर्ण करावयाच्या सूचना दिल्या आहेत.

   

राज्य शासनाच्या दिनांक २० नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989 (सुधारित अधिनियम 2015) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क व गट ड संवर्गातील पदावर शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याबाबतची सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. यानुसार व्यक्तीची पत्नी / पती., दिवंगत व्यक्तीचा विवाहित/ अविवाहित मुलगा/ मुलगी तसेच मृत्युपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला विवाहित/ अविवाहित मुलगा/ मुलगी., दिवंगत व्यक्तीचा मुलगा हयात नसेल अथवा नियुक्तीसाठी पात्र नसेल तर अशा परिस्थितीत दिवंगत व्यक्तीची सून., दिवंगत व्यक्तीची घटस्फोटीत /विधवा/ परितक्त्या मुलगी अथवा घटस्फोटीत/ विधवा/ परितक्त्या बहीण. दिवंगत व्यक्ती अविवाहित असल्यास त्याचा भाऊ अथवा बहीण यापैकी एका पात्र वारसास सदरचा लाभ मिळणार आहे.

   

  सातारा जिल्ह्यातील ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल 43 खून प्रकरणातील पिडीतांच्या वारसांनी नोकरीकामी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, शासन निर्णयासोबत देण्यात आलेली परिशिष्ट २ ते ६ नुसार परिपुर्ण भरून सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003 येथे दि. 8 डिसेंबर, 2025 पुर्वी जमा करावीत, असे आवाहन सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक,सातारा 415003 या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.




Tags

Post a Comment

0 Comments