वृत्तरत्न नवमहाराष्ट्र न्यूज
मोहन दिपके
सर्वप्रथम ट्रेनिंगची सुरुवात ओळखीने झाली. नंतर पंचशीला ताईने महिलांना राजस्थान च्या भवरी देवीची गोष्ट सांगितली आणि या केस वरून विशाखा गाईड लाइन कशा पद्धतीने तयार झाले हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
यानंतर महिलांना हा कायदा अधिक समजण्यासाठी त्यांना एक शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार दिसून आले. या मुद्यावरून ताईंनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम, २०१३ ( POSH Act, 2013 ) ( sexual Harrassment at Workplace) हा सविस्तर सांगण्यास सुरुवात केली.
कायद्याची माहिती महिलांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत समजावली.
लैंगिक छळाची व्याख्या काय आहे. असे महिलांना विचारण्यात आले असता. महिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी गोंधळात टाकणारे होते. पण जेव्हा ताईंनी सांगितले की लैंगिक छळ म्हणजे आपल्याला कामाच्या ठिकाणी १)शारीरिक स्वरूपातील वर्तन म्हणजे जबरदस्तीने आपल्या शरीराला हात लावणे, मिठी मारणे, हात पकडणे, शरीराला चिटकून उभे राहणे ज्याने आपल्याला किळसवाणे वाटेल.
२) मौखिक वर्तन - अश्लील टिपणी, डबल मिनिंग बोलणे ज्यातून लैंगिक पिडा उत्पन्न होईल.३) गैरमौखिक - अश्लील हावभाव करणे, शरीराकडे घाणेरड्या नजरेने पाहणे, अश्लील फोटो / व्हिडिओ दाखवणे. अशा प्रकाराने महिलेला लज्जास्पद वाटेल असे वर्तन करतात.
४) व्यावसायिक दडपणाचे वर्तन - यामध्ये जर तुम्ही कामावर पुरुष मग तो कामगार असेल,मालक असेल, ठेकेदार असेल त्याची लैंगिक भूक नाही भागवली तर तो तुम्हाला कामावरून काढून टाकेल अशी धमकी देऊन जबरदस्ती करत असेल तर तोही गुन्हा धरला जातो.
या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण कामाच्या ठिकाणी मिळाले पाहिजे. त्यांच्या तक्रारीचे तत्काळ निराकरण झाले पाहिजे हा आहे. यामध्ये कोणत्या ठिकाणी हा कायदा लागू होतो हे देखील ताईंनी सांगितले. सरकारी ऑफीस, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, NGO, दुकान, कारखाना, तसेच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी देखील या कायद्यात संरक्षण आहे.जर आपल्यासोबत किंवा इतर आपल्या महिला सहकाऱ्यांसोबत अशा घटना घडत असतील तर आपण ही तक्रार कुठे करायची याबाबत सखोल माहिती दिली.
जर आपल्या कामावर अशा घटना घडत असतील तर कायद्यातील तरतुदी नुसार कामाच्या ठिकाणी ICC
( internal complaints committee - ) अंतर्गत तक्रार समिती असणे आवश्यक स्थापित असते. त्या समितीकडे तक्रार करावी, व समितीने 90 दिवसात सर्व प्रकारची गोपनीयता ठेवून घटनेचा तपास करायचा असल्याची माहिती दिली. तसेच या समितीने जर तक्रारदार महिले सोबत न्याय देण्यासाठी भेदभाव केला केला किंव्हा दिरंगाई केली तर त्यांनाही 50 हजार दंड द्यावा लागणार असल्याची माहिती दिली. जर महिलेला अंतर्गत समितीच्या निकालाबाबत शंका असेल किंव्हा समाधानी नसेल तर जिल्ह्यात पातळीवरील समितीकडे तक्रार करू शकते अशी माहिती पंचशीला ताईने दिली.
या वेळी ओजस बहू उद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव सुनीता गरुड, सभासद कोमल पायाळ, सपना रोकडे व कंपनीच्या व्यस्थापक दीपाली मोहोळकर व इतर महिला सहकारी व कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पॉश (POSH) ट्रेनिंग
दिनांक - ३/१२/२०२५
आयोजक - सुपर पोलिमेयर, चाकण.
प्रशिक्षक - पंचशीला ताई
राज्य संघटक,नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस महाराष्ट्र व अध्यक्ष
ओजस बहुद्देशीय सामाजिक संस्था
उपस्थिती - 40


Post a Comment
0 Comments