वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर :रेल्वे स्थानकावरील उर्दू भाषेतील सार्वजनिक संकेतफलक हटवण्याच्या निषेधार्थ सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत सुरुवातीला काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानकावरील बहुभाषिक फलकातील उर्दू मजकूर हटवण्यात आल्याचा आरोप SDPI ने केला होता. त्याविरोधात निदर्शने करण्यासाठी कार्यकर्ते स्थानक परिसरात जमले. पोलिसांनी आंदोलकांना परवानगी नसल्याचे सांगत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान काहींना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर SDPI ने निषेध नोंदवित आगामी काळात मोठे आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली
आहे. फलक हटवणे हा भाषिक अधिकारांचा अवमान असल्याचा आरोप पक्षाने केला.
पोलिसांनी मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले असून, अनधिकृत आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.


Post a Comment
0 Comments