वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : आयु. विशाल साहेबराव गायकवाड (पुणे जिल्हा)
महाळुंगे, खेड, पुणे
श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालय, महाळुंगे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील घेण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बौद्धाचार्य आयु. विशाल साहेबराव गायकवाड (ऑडीटर, भारतीय बौद्ध महासभा, पुणे जिल्हा), आयु. हनुमंत बेहडे (संपादक – माय माऊली न्यूज चॅनल), सदानंद गवई (अध्यक्ष – रिपब्लिकन सेना, पुणे जिल्हा) तसेच आयु. उषा कांबळे (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती) उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महामानवांच्या विचारांना अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आयु. विशाल गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य त्यागाची माहिती देत, त्या त्यागाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करावा, असे आवाहन केले. तसेच संत श्रीपती बाबा महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
अनिल पाटील सरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य वाय. जी. कांबळे सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशाचे आहेत आणि त्यांचे कार्य सर्व मानवजातीसाठी आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास कवडे सर यांनी केले, तर दादा आढाव सरांनी आभारप्रदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Post a Comment
0 Comments