Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन; सामाजिक चळवळीला मोठा धक्का

 

डॉ. बाबा आढाव.
वृतरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

 कष्टकरी, कामगार आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक व कामगार चळवळीला मोठा धक्का बसला आहे.


डॉ. बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण जीवन कष्टकरी, हमाल, माथाडी, असंघटित कामगार, भाजीपाला विक्रेते आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी समर्पित केले होते. त्यांनी उभारलेल्या संघटना व चळवळींमुळे हजारो कामगारांना न्याय, हक्क व सन्मान मिळाला. अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.


साधी राहणी, स्पष्ट विचार आणि ठाम भूमिका हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सामाजिक न्याय, समता आणि माणुसकीच्या मूल्यांवर त्यांची निष्ठा होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते घडले आणि समाजकार्याची चळवळ अधिक बळकट झाली.


डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने एक प्रखर विचारवंत, लढवय्या समाजसेवक आणि कष्टकऱ्यांचा खरा आधार हरपला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.



Post a Comment

0 Comments