वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
शहापूर : शंकर गायकवाड
शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालय, किन्हवली येथे सोमवार दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या पालक सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभेचे अध्यक्षस्थान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली यांनी भूषविले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे उपस्थित होते. यांच्यासह विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष खंडूमामा विशे, लक्ष्मण बांगर, मुख्याध्यापक जी. एच. वेखंडे, जी. टी. खकाळ, आर. जे. सावंत, उपमुख्याध्यापक एम. व्ही. होळीकर, पर्यवेक्षक एस. जी. निळे, पालक प्रतिनिधी व पत्रकार किशोर चन्ने, तसेच दैनिक सकाळचे पत्रकार श्याम पतंगराव यांची प्रमुख उपस्थिती होती. मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पत्रकार उपस्थित होते.
सभेची सुरुवात प्रास्ताविकाने झाली, ते मुख्याध्यापक जी. एच. वेखंडे यांनी मांडले. पालक प्रतिनिधी म्हणून किशोर चन्ने यांनी आपले विचार व्यक्त करत पालक-शिक्षक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व भूमिपुत्र असलेले गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांचा संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब भानुशाली यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
ईशस्तवन व स्वागतगीतासाठी विनोद फर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. ध्वनियंत्रणेची जबाबदारी भरत वरकुटे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना देसले व श्री. दिनेश फर्डे यांनी केले. छायाचित्रण ओमकार घुडे यांनी केले, तर मंदार क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





Post a Comment
0 Comments