Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

तळवाडे येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप

 


किन्हवली प्रतिनिधी – बाळकृष्ण सोनावणे

तळवाडे ▪ सोमवार, दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात तळवाडे येथे संपन्न झाल्या. केंद्राचे केंद्र प्रमुख मा. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.


स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन गावाचे पोलिस पाटील मच्छिंद्र मराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बुधाजी बरतड, तसेच तळवाडे गावाचे माजी सरपंच अंकुश बरतड हे मान्यवर उपस्थित होते.


केंद्रातील वरिष्ठ शिक्षक मा. विजय धानके, विजय वाढविंदे, दीपक बनसोडे, शिखरे, सावंत, जगदीश बोदडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी संयोजन, मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध आयोजनामधून मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.


या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, संघभावना आणि क्रीडाप्रेमाची नवीन ऊर्जा निर्माण झाली असून उपस्थित मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



Post a Comment

0 Comments