प्रतिनिधी : शंकर गायकवाड
नाशिकच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा आणि निर्णायक क्षण ठरावा अशी जाहीर सभा नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानात मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले की, नाशिकच्या विकासावर आलेल्या रावणरूपी वृत्तीच्या संकटाला दूर करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी विचारपूर्वक मतदान करून परिवर्तनासाठी आपले एकमत दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच तपोवनसारख्या पावन भूमीवर राज्यकर्त्यांची पडलेली वक्रदृष्टी खोडून काढण्यासाठी सज्ज होण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ही जाहीर सभा म्हणजे जनतेच्या मनातील भावना, अपेक्षा आणि असंतोषाचा स्पष्ट आवाज ठरली. नाशिककरांच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी एकजूट अधिक मजबूत झाल्याचे चित्र या सभेतून स्पष्ट झाले.
या जाहीर सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, सर्व उमेदवार तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments