वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : आनंदा भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळ तसेच कल्याण–कसारा शाखेच्या वतीने कालकथित काॅ. कमलाकर शंकर पराड (उपाध्यक्ष) यांच्या पुण्यानुमोदन शोकसभेचे आयोजन आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. काॅ. कमलाकर शंकर पराड यांचे निधन 4 जानेवारी 2026 रोजी झाले होते.
काॅ. पराड हे रेल्वेच्या विद्युत लोको शेड येथे कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन कसारा शाखेत पदाधिकारी म्हणून सक्रिय भूमिका बजावली. ते एक लढवय्ये कामगार, चळवळीशी एकनिष्ठ आणि समाजकार्यामध्ये सदैव अग्रेसर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.
या शोकसभेस राजकीय, शैक्षणिक तसेच युनियन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी काॅ. पराड यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गौरव केला व प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला.
अशा या लढवय्या कामगारास ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळ तसेच कल्याण–कसारा शाखेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. सदर शोकसभा जानकी विद्यालय, मांडा, टिटवाळा येथे संपन्न झाली.


Post a Comment
0 Comments