Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

टिटवाळा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : शंकर गायकवाड 

भारतीय बौद्ध महासभा, ठाणे जिल्हा अंतर्गत कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरातील टिटवाळा (पूर्व) नालंदा शाखेच्या वतीने दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सिद्धार्थ बुद्ध विहार, मांडा, टिटवाळा (पश्चिम) येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष आदरणीय शीलाताई तायडे यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी बहुजन उत्थान सेवा समितीचे अध्यक्ष आदरणीय विजयजी भोईर साहेब, आदरणीय बंदेशजी जाधव साहेब, आदरणीय सनीजी जाधव साहेब तसेच नालंदा शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संदीप घायवट यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वधू-वर परिचय मेळाव्यास पन्नासहून अधिक उमेदवारांनी नोंदणी करून आपला सविस्तर परिचय दिला. समाजातील विवाहविषयक अडचणी दूर करून सुसंवाद व योग्य जुळवणीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


नालंदा शाखा गेल्या चार वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत असून, याशिवाय आरोग्य शिबिरे, समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरे, वर्षावास, बारा पौर्णिमा, धम्म पर्यटन तसेच विविध सामाजिक व प्रबोधनात्मक शिबिरे नियमितपणे आयोजित करत असते.

या कार्याबद्दल ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय के. एल. उघडे गुरुजी व आदरणीय भागीरथ शिंदे गुरुजी यांनी नालंदा शाखेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

0 Comments