Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळ व कसारा शाखेचा उपक्रम

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : आनंद भालेराव

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ व कसारा शाखेच्या वतीने आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी कसारा रेल्वे स्थानक येथे एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी आयु. अर्जुन देवराम मु. कुरेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथील सेवानिवृत्त मुख्य गाडी लिपीक (कामगार कल्याण यार्ड) यांची भेट घेण्यात आली.


सेवानिवृत्तीस १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेंशनमधून दरमहा कापली जाणारी कम्युनिटी पेंशन रक्कम रुपये 2365/- ही कपात बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी आवश्यक फॉर्म भरून संबंधित बँकेत जमा करण्यात आले असून, यापुढे सदर रक्कम नियमितपणे पेंशनमध्ये दरमहा मिळणार आहे.

या वेळी कसारा शाखेचे काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी), काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी) तसेच काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री) उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने

“जीके लाल सलाम, एनआरएमयू जिंदाबाद, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.


हा उपक्रम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटनेने केलेल्या कार्याचे उत्तम उदाहरण ठरत असून, पेंशनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




Post a Comment

0 Comments