Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पिंपरी-चिंचवडचे ‘गोल्डन मॅन’ सनी वाघचौरे यांना बिष्णोई गँगकडून ५ कोटींची खंडणी, जीवे मारण्याची धमकी

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : मनोहर गायकवाड

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘गोल्डन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले सनी वाघचौरे यांना कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खंडणी न दिल्यास माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यासारखी अवस्था करण्याची तसेच शरीरात सोन्यापेक्षा अधिक गोळ्या घालण्याची थेट धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


सनी वाघचौरे हे त्यांच्या अंगावर परिधान केलेल्या तब्बल किलोभर सोन्याच्या दागिन्यांमुळे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात ओळखले जातात. त्यांच्या या अनोख्या ओळखीमुळे ते कायम चर्चेत असतात.


मिळालेल्या माहितीनुसार, सनी वाघचौरे यांना कॅनडामधील एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख बिष्णोई गँगचा सदस्य ‘शुभम लोणकर’ अशी करून दिली. “आम्ही कोण आहोत, हे गुगलवर सर्च कर,” असे सांगून त्याने कॉल कट केला.


यानंतर सनी वाघचौरे यांना व्हॉट्सॲपवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये, “तुझ्याकडे पाच दिवसांचा वेळ आहे. पैसे दिले नाहीत, तर तुझी अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करू. जेवढे सोने तू अंगावर घालतोस, त्यापेक्षा जास्त पितळ तुझ्या शरीरात भरू,” अशी भीषण धमकी देण्यात आली आहे.


या गंभीर प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सनी वाघचौरे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. पोलिसांनी खंडणी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आंतरराष्ट्रीय क्रमांक तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे.



Post a Comment

0 Comments