Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वंचित बहुजन आघाडीच्या लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली.

 


प्रतिनिधी : शंकर गायकवाड .

प्रचार सभेत मार्गदर्शन करतांना सुजात आंबेडकर म्हणाले कि, आपल्या गणाचा, गटाचा आणि गावाचा विकास हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ठरतो.


रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, दर्जेदार शाळा, आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळतो का, पीकविमा मिळतो का, नुकसानभरपाई मिळते का? हे सर्व प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतच सोडवले जातात.


म्हणूनच ही जिल्हा परिषद निवडणूक जाती व धर्माच्या नावावरची नाही, तर विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे मतदान फक्त विकासाच्या नावावरच केले पाहिजे.


आतापर्यंत विकासाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार निवडून द्या. असे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकरिणी सदस्य अविनाश भोसीकर, मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, तालुकाध्यक्ष आर. के आचार्य जेष्ठ नेते कमलाकर चिकटे आणि सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती चे उमेदवार उपस्थित होते.



Tags

Post a Comment

0 Comments