वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी । शंकर गायकवाड .
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चोंढे खुर्द येथे अमूव फाऊंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी थंडीपासून संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्वच्छतेसाठी टुथब्रश व टूथपेस्ट, इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पॅडसह विविध शालेय साहित्य देण्यात आले.
यासोबतच विद्यार्थ्यांना चॉकलेट्स, वडापाव तसेच आगामी मकरसंक्रांती सणानिमित्त तिळगूळ लाडू वाटप करून भरगच्च खाऊची मेजवानी देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या कार्यक्रमास अमूव फाऊंडेशनचे ओमप्रकाशजी मुरारका, चंद्रकलाजी मुरारका, मधु कनोई मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. अमूव फाऊंडेशनच्या या अनमोल सामाजिक दातृत्वाबद्दल शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा, चोंढे खुर्द
केंद्र – डोळखांब
ता. शहापूर, जि. ठाणे


Post a Comment
0 Comments