वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
ठाणे जिल्हा संपादक - शंकर गायकवाड
शहापूर -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरपत २ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आदिवासी युवा संघटना शहापूर तालुका अध्यक्ष जगू निरगुडा साहेब प्रमुख उपस्थित होते. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शिक्षिका रुपाली वायाळ मॅडम, अंगणवाडी सेविका दुर्गा हरड यांचा मोलाचा सहभाग लाभला. कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments