Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*सामाजिक संघर्ष व निर्भीड पत्रकारितेची दखल : संदेश भालेराव यांना जन्मदिनानिमित्त ‘आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार’ जाहीर*

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : शंकर गायकवाड 

ठाणे जिल्ह्यात सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने संघर्ष करत निर्भीड, प्रामाणिक आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून परिवर्तनाची भूमिका घेणारे प्रख्यात पत्रकार व समाजसेवक संदेश तुकाराम भालेराव यांना १ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्त ‘आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आदरणीय प्रमोदजी शिंदे सर यांनी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे.

संदेश भालेराव यांनी पत्रकारितेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, वंचित, पीडित व दुर्लक्षित समाजघटकांचा बुलंद आवाज बनवला आहे. सामाजिक अन्याय, अत्याचार, प्रशासनातील त्रुटी तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने ठाम व परखड भूमिका घेत समाजजागृतीचे कार्य केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ, संघर्षशील आणि परिवर्तनवादी कार्याची दखल घेतच हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


संदेश भालेराव हे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या संघटनेशी दीर्घकाळापासून सक्रियपणे कार्यरत असून, संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव आदरणीय डॉ. केवलजी उके साहेब तसेच महाराष्ट्र राज्य सचिव आदरणीय वैभवजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर एकनिष्ठतेने संघर्ष केला आहे. संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात, जनआंदोलनात तसेच पीडितांच्या न्यायासाठीच्या लढ्यात ते ठामपणे उभे राहताना दिसून येतात.

या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीतून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या भूमिकेमुळेच संदेश भालेराव यांना जन्मदिनानिमित्त ‘आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.


या निमित्ताने वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीमकडून संदेश भालेराव यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे. सहकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेच्या कार्याचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

संदेश भालेराव हे वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक, तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज आणि दैनिक अजिंठा टाइम्सचे मुंबई विभाग प्रमुख असून, पत्रकारितेला शोषित, पीडित व वंचित बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून वापरण्याची भूमिका त्यांनी सातत्याने जपली आहे.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

मुख्य संपादक : सागरजी रोकडे



Post a Comment

0 Comments