Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

विविध गुणदर्शन स्पर्धेत समूहगायन (लहान गट) मध्ये जि. प. शाळा सावरोली सो प्रथम.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : शंकर गायकवाड

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये लोकनृत्य, समूहगायन, वक्तृत्व व नाट्यस्पर्धांचा समावेश असतो.


याच उपक्रमांतर्गत महसूल तालुका स्तरावर सोमवार, दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी दमानी हायस्कूल, शहापूर येथे तालुकास्तरीय समूहगायन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत लहान गटात जि. प. शाळा सावरोली सो (ता. शहापूर) हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.


या स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गंगाराम ढमके यांनी गीतलेखन व संगीतबद्ध करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे शिक्षक श्री. संदेश यशवंतराव आणि सौ. तेजस्विनी शिरवले मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.


या यशाबद्दल मा. गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री. हिराजी वेखंडे साहेब, विस्ताराधिकारी श्रीमती शिवानी पवार मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती, महिला सुरक्षा समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, ग्रामपंचायत सावरोली सो तसेच सर्व ग्रामस्थ मंडळींनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शाळेचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.



Post a Comment

0 Comments