वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ममता दिनाचे औचित्य साधून शिवसेना दिनदर्शिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ममता दिनानिमित्त ‘माँ साहेब’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे साहेब, रमेश जगे सर, तालुकाप्रमुख कुलदीप धानके, शहर प्रमुख विजय देशमुख, संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख, डॉ. अजित पोद्दार, गणेश आवसरे साहेब, राजा फर्डे, शरद मोगरे, महिला जिल्हा प्रमुख रश्मी निमसे, महिला तालुका प्रमुख गुलाबताई भेरे, सचिव आश्विनी वारघडे, तसेच प्रदीप पितळे, बाळा निमसे, हेमंत मोरे यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ममता दिनाचे महत्त्व विषद करत सामाजिक बांधिलकी आणि संघटन बळकट करण्याचा संदेश दिला. कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
![]() |


Post a Comment
0 Comments