Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कल्याणमध्ये ज्येष्ठ रेल्वे पेन्शनधारकाला दिलासा : फॅमिली पास कल्याण कार्यालयातून मिळवून दिला.

 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

कल्याण :आनंदा भालेराव

दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सुखदेव गंगाराम पगारे (मामा), वय वर्षे ७८, सेवानिवृत्त कामगार (रेल्वे वर्कशॉप, माटुंगा), रा. सिद्धार्थ नगर, कोळसेवाडी, कल्याण यांचा फॅमिली पास माटुंगा वर्कशॉप मुख्यालयाऐवजी सहायक अभियंता, कल्याण कार्यालयातून मिळवून देण्याचे यशस्वी कार्य करण्यात आले.

वयोमानानुसार कल्याण ते माटुंगा असा प्रवास करणे अवघड असल्याने, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन (मुंबई मंडळ व कसारा शाखा) यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. या कामासाठी कॉ. जे. एन. पाटील व कॉ. पी. एस. शिंदे या मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमाबद्दल कॉ. वेणू पी. नायर (महामंत्री) यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी यावेळी संघटनेच्या कार्याला सलाम करत

“जीके लाल सलाम”, “ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद”, “एन. आर. एम. यू. जिंदाबाद”
अशा घोषणा दिल्या.

ज्येष्ठ पेन्शनधारकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी संघटनांनी दाखवलेली तत्परता ही आदर्श ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली.



Post a Comment

0 Comments