वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालात वंचित बहुजन आघाडीने (VBA) उल्लेखनीय यश मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. लातूर, अकोला आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) महानगरपालिकेतील अनेक प्रभागांमध्ये वंचितचे उमेदवार विजयी झाले आहेत.
लातूर महानगरपालिका निवडणुकीत
प्रभाग क्र. 13 (अ) मधून वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे यांनी विजय मिळवला.
अकोला महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अनेक जागांवर यश संपादन केले.
प्रभाग क्र. 3 (ड) : निलेश देव विजयी
प्रभाग क्र. 14 (क) : पराग गवई विजयी
प्रभाग क्र. 14 (अ) : उज्वला पातोडे विजयी
प्रभाग क्र. 14 (ड) : शेख शमशू कमर शेख साबीर विजयी
याशिवाय,
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) महानगरपालिका निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
प्रभाग क्र. 3 (अ) : अमित भुईगळ विजयी
प्रभाग क्र. 3 (क) : करुणा मेघानंद जाधव विजयी
प्रभाग क्र. 3 (ड) : अफसर खान (यासीन खान) विजयी
या विजयांमुळे शहरी भागातील वंचित, कामगार, अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येतो. स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर केलेल्या प्रचाराचा फायदा वंचित बहुजन आघाडीला झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
महानगरपालिका स्तरावर वाढत असलेली ही ताकद आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


Post a Comment
0 Comments