वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : रितेश साबळे
अकोला | अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भीमनगर, अकोला येथे जाहीर सभा उत्साहात पार पडली.
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, बार्शिटाकळी येथे मुस्लिम महिलेला नगराध्यक्ष बनवण्याचे ऐतिहासिक काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देत सत्तेत सहभागी करून घेतले.
ज्या समाजाला प्रस्थापित पक्षांनी कधीच योग्य प्रतिनिधित्व दिले नाही, त्या समाजाला वंचित बहुजन आघाडीने सन्मानाने प्रतिनिधित्व दिले आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
अकोला शहराच्या सर्वांगीण आणि समताधिष्ठित विकासासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना केले.
या सभेस वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments