वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : आनंदा भालेराव
कसारा (ता. इगतपुरी) : आनंद फाऊंडेशन सामाजिक संस्था (कसारा), महाराष्ट्र यांच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील माऊली वृद्धाश्रमास भेट देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत पॅरॅशूट तेल, आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण, कोलगेट टूथपेस्ट व ब्रश तसेच बिस्कीट यांसारख्या जीवनावश्यक वस्तू वृद्धांना वितरित करण्यात आल्या. वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहून संस्थेच्या कार्यकर्त्यांनाही समाधानाची भावना लाभली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भरीत, उपाध्यक्ष संतोष पगारे, सचिव बाळासाहेब भरीत, कोषाध्यक्ष रमेश पवार, सदस्य राजू कडलक यांच्यासह माऊली वृद्धाश्रमचे व्यवस्थापक श्री. विलास करंदीकर (काका) तसेच पिंपरी सदो येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णा उबाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू व दुर्लक्षित घटकांच्या सेवेसाठी आनंद फाऊंडेशन सातत्याने कार्यरत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments