वृत्तरत्न नाव महाराष्ट्र न्यूज
कल्याण : आनंदा भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ अंतर्गत कल्याण–कसारा शाखेच्या वतीने आज दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी आसनगाव येथील रहिवासी, ज्येष्ठ सेवानिवृत्त रेल्वे पेंशनर *आदरणीय बाळाराम वायले (वय ८० वर्षे)* यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना मिळणारा फॅमिली पास टिटवाळा रेल्वे स्थानकात प्रदान करण्यात आला.
सदर फॅमिली पास हा मुख्यालय मुंबई मंडळ येथे मिळत असला, तरी वृद्धापकाळामुळे आणि आसनगाव ते मुंबई प्रवास कठीण असल्याने, संघटनेने विशेष पुढाकार घेत टिटवाळा रेल्वे स्टेशन येथेच पास देण्याची व्यवस्था केली. या मानवतावादी आणि सेवाभावी उपक्रमाचे रेल्वे पेंशनर व त्यांच्या कुटुंबीयांनी मनापासून स्वागत केले.
या कार्यासाठी मुंबई मंडळ तसेच कल्याण–कसारा शाखेचे पदाधिकारी व प्रशासनाकडून वेल्फेअर इन्स्पेक्टर (कल्याण–कसारा विभाग), चीफ ओ.एस. तसेच सीनियर क्लार्क यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी संघटनेचे घोषवाक्ये
*“काॅ. वेणु पी. नायर महामंत्री जिंदाबाद”,*
*“जी. के. लाल सलाम”,*
*“एन. आर. एम. यु. जिंदाबाद”*
तसेच
*“ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद”*
अशा जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या.
हा उपक्रम म्हणजे संघटनेच्या ज्येष्ठ पेंशनरांप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श नमुना असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment
0 Comments