प्रतिनिधी : शंकर गायकवाड
महाराष्ट्र राज्यातील दीर्घकाळ रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत.
कोकण विभागातील जिल्हे :
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
पुणे विभागातील जिल्हे :
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर
छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे :
छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव
या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार असून, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
• उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख : १६ जानेवारी
• उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : २१ जानेवारी
• उमेदवारी अर्ज छाननी : २२ जानेवारी
• उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २७ जानेवारी
• मतदान : ५ फेब्रुवारी
• मतमोजणी : ७ फेब्रुवारी
जिल्हा परिषद निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी निवडले जाणार असून, याचा थेट परिणाम विकासकामांवर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत करणे, आचारसंहिता अंमलबजावणी आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा रंगात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments