Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

१३ वर्षीय मुलाचे अपहरण वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

राजणगाव (छत्रपती संभाजीनगर): रितेश साबळे 

राजणगाव शें.पु. परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.


अपहरण झालेल्या मुलाची आई वर्षा राजेश देहाडे (वय ३०, व्यवसाय – शेती, रा. वरद हॉस्पिटल परिसर, रांजणगाव, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सुनील राजेश देहाडे (वय १३) हा दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घरासमोरील गल्लीत खेळत होता. मात्र सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत तो घरी परतला नाही.


मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात, नातेवाईकांकडे तसेच शाळेतील मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला. आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवूनही मुलाचा काहीही पत्ता लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून मुलास पळवून नेले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.


हरवलेल्या मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –

सुनील देहाडे याची उंची सुमारे ३ फूट ५ इंच, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे व बारीक आहेत. त्याने सोनेरी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केली असून तो मराठी भाषा बोलतो.


या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. दरम्यान, मुलाचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी आई वर्षा देहाडे यांनी माध्यमांमार्फत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


या प्रकरणाची दखल घेत वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केली असून, पोलिस तपासाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेत जनजागृतीच्या उद्देशाने ही माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर .

संपादक : संदेशजी भालेराव सर .

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

जाहिरातीसाठी संपर्क करा : 88 30 70 85 22 .





Post a Comment

0 Comments