Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

उमीद कार्ड शिबीर यशस्वी; रेल्वे पेंशनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : आनंदा भालेराव

कसारा : ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ तसेच कल्याण–कसारा शाखेच्या वतीने उमीद कार्ड शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. मार्गदर्शक म्हणून कॉ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या उपस्थितीत हे शिबीर आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत पी.डब्ल्यू.आय. ऑफिस, कसारा येथे आयोजित करण्यात आले होते.

डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (सेटलमेंट विभाग) यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात किमान 15 ते 20 सेवानिवृत्त रेल्वे कामगारांनी सहभाग घेऊन उमीद कार्ड काढले. शिबीर यशस्वी होण्यासाठी ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ तसेच कल्याण–कसारा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी मुंबई मंडळाचे सचिव कॉ. आनंदा भालेराव, कसारा शाखेचे अध्यक्ष कॉ. प्रल्हाद खंदारे, सचिव कॉ. दिलीप वेंखडे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. दिलीप शिंदे, खजिनदार कॉ. अशोक सोनावणे, उपाध्यक्ष कॉ. गुलाब शिंदे यांच्यासह प्रशासनाकडून वेल्फेअर इन्स्पेक्टर (कल्याण–कसारा विभाग), चीफ ओ.एस., सीनियर क्लार्क आदी मान्यवर उपस्थित होते.


शिबिराच्या यशाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी “कॉ. वेणु पी. नायर महामंत्री, जी.के. लाल सलाम, एन.आर.एम.यू. जिंदाबाद, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या.



Post a Comment

0 Comments