वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
*कार्यकारी संपादक : रितेश साबळे*
वाळूज (छ. संभाजीनगर) :
एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव शे.पू परिसरातून एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची गंभीर घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मात्र अनेक दिवस उलटूनही मुलाचा ठोस ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यान, बेपत्ता मुलाच्या आईने *वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक रितेश साबळे यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेट घेतली व संपूर्ण घटनेची माहिती दिली.* मुलाचा शोध घेण्यासाठी मदतीची विनंती केल्यानंतर रितेश साबळे यांनी तात्काळ तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.
यानंतर त्यांनी प्रत्यक्ष एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची दिशा, प्रगती आणि अडचणी याबाबत सखोल चर्चा केली. पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करत, कोणत्याही तपास प्रक्रियेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेत त्यांनी संबंधित पीआय साहेबांची भेट घेऊन आवश्यक परवानगी घेतली. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे संभाव्य ठिकाणी जाऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत माहिती संकलित करण्यात आली.
अखेर मुलगा कन्नड येथे त्याच्या आत्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. तपास प्रक्रियेचा भंग होऊ नये म्हणून *रितेश साबळे यांनी थेट हस्तक्षेप न करता ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत ही केस तपास अधिकारी*
*चांदे मॅडम यांच्याकडे सोपवली* व त्यांना मुलाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
*चांदे मॅडम* यांनी कनक . येथे जाऊन मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले व एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व पीआई साहेबांनी *मुलाचा जबाब नोंदवून त्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले* . सध्या मुलगा पूर्णपणे सुखरूप असून कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
“वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक रितेश साबळे यांच्या सहकार्यामुळे ही केस अत्यंत कमी वेळेत सुटली. त्यांच्या प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि कायद्याच्या चौकटीत केलेल्या मदतीमुळे आम्हाला मुलाला लवकर ताब्यात घेऊन कुटुंबाकडे सुपूर्द करता आले.”
*या प्रकरणात वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक रितेश साबळे यांच्या अथक प्रयत्नांसोबतच एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून ही घटना माध्यमे व पोलीस यांच्यातील सकारात्मक समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.*


Post a Comment
0 Comments