वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
कांदळी :राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा कांदळी येथे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला ग्रामस्थ महिला नंदिनी बेलवले व विद्या पुलखुंटवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले. कार्यक्रमात शिक्षक अशोक गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही जिजाऊंच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवा दिनानिमित्त विद्यार्थी, युवक व शिक्षकांनी एकत्रितपणे अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा घेत सामाजिक जाणीव व्यक्त केली.
या जयंती कार्यक्रमास कांदळी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच नम्रता जाधव, ग्रामस्थ महिला नंदिनी बेलवले, विद्या पुलखुंटवार, आशा वर्कर मानसी जाधव, अंगणवाडी कर्मचारी कविता जाधव, मदतनीस गोदावरी जाधव, शिक्षिका जयश्री पष्टे, सहशिक्षक अशोक गायकवाड तसेच युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments