वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सोशल मीडिया संपादक : मोहन दीपके
भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसरात यंदाही सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) या अग्रगण्य संघटनेच्या वतीने भव्य पोस्टकार्ड अभियान राबवण्यात आले. अन्याय, अत्याचार आणि भेदभावाविरुद्ध सातत्याने संघर्ष करत पीडितांना न्याय मिळवून देणाऱ्या NDMJ च्या या उपक्रमाला भीम अनुयायांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अनुसूचित जाती-जमातींच्या हक्कांसाठी राज्यभर जनआंदोलन उभारणाऱ्या NDMJ ने आतापर्यंत जातीय अत्याचारात खून झालेल्या ८८९ पीडित कुटुंबांना शासनदरबारी पाठपुरावा करून नोकरी, जमीन व पुनर्वसन मिळवून दिले आहे. या उल्लेखनीय कार्याचा पुढील टप्पा म्हणून, भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायांच्या सहभागातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ५० पैशांच्या पोस्टकार्डद्वारे जनभावना मांडण्यात आल्या.
या पोस्टकार्ड अभियानातून पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या—
1. बजेट कायदा : अनुसूचित जाती-जमातींचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये व गैरवापर थांबवण्यासाठी महाराष्ट्रात बजेटचा कायदा तात्काळ लागू करावा.
2. नितीन आगे प्रकरण : खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणाची फेरतपासणी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी.
3. शशांक योजना : ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात शशांक योजना लागू करावी.
4. स्वतंत्र न्यायालये : प्रत्येक जिल्ह्यात ॲट्रॉसिटी प्रकरणांसाठी स्वतंत्र व जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालये सुरू करावीत.
5. जमीन वाटप : दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी रद्द करून भूमिहीन अनुसूचित जमातींना शासकीय जमिनींचे वाटप करावे.
6. बढती आरक्षण : पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा कायदा तात्काळ पारित करावा.
यासोबतच अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, तसेच खैरलांजी येथील भैयालाल भोतमांगे सामुदायिक हत्या प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात यावी, अशाही ठाम मागण्या पोस्टकार्डद्वारे नोंदवण्यात आल्या. या अभियानात सामाजिक क्षेत्रातील नामवंत विचारवंत, लेखक व सिने-कलावंतांनीही सहभाग घेतला.
हे अभियान राज्य महासचिव ॲड. डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राज्य सचिव वैभव गीते, राज्य सहसचिव पी. एस. खंदारे, राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे आणि राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. “केवळ घोषणा नको, तर अंमलबजावणी हवी” या ठाम भूमिकेतून NDMJ चे कार्यकर्ते मैदानात उतरले असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
पोस्टकार्ड अभियान यशस्वी करण्यासाठी जयंत पोटे, विकास भारस्कर, सुनिता गरुड, सत्यवान गरुड, विश्वनाथ घोडके, आम्रपाली मोहिते, लक्ष्मी वाघमारे, सिद्धार्थ ओव्हाळ, विक्रांत भोसले, किरण सोनवणे, अजय चंदनशिव, प्रथमेश कुंभारकर, रोहन जगताप, शुभम खवळे, संजय माकेगावकर, आशिष धांडोरे, अविनाश ताकतोडे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.





Post a Comment
0 Comments