Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा जाळणे म्हणजे थेट राष्ट्रविरोधी कृत्य – ॲड. प्रकाश आंबेडकर*

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

 कार्यकारी संपादक : रितेश साबळे

 *डॉ. भीमराव आंबेडकर* यांच्या प्रतिमा जाळणे हे थेट *राष्ट्रविरोधी कृत्य असून* , अशा प्रकारामागे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलांची भीती स्पष्टपणे दिसून येते, असे तीव्र मत *वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.* 


पिढ्यान्‌पिढ्या उपभोगल्या जाणाऱ्या विशेषाधिकारयुक्त सामाजिक स्थानाला आता प्रश्न विचारले जात आहेत. त्यातूनच ही असहिष्णु मानसिकता पुढे येत असून, भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या वचनाला नाकारणे, दलित समाजाविषयी खोलवर रुजलेली द्वेषभावना आणि दलित आत्मसन्मानाच्या अभिव्यक्तीचे अमानवीकरण याचे हे ठळक उदाहरण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


भाजपशासित राज्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळाशिवाय अशी भारतविरोधी घटना घडणे अशक्यप्राय असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सूचित केले. “मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की, आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालेल, मनुस्मृतीवर नाही. हा देश फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारधारेवर चालेल, मनुवादावर नाही,” असे त्यांनी ठाम शब्दांत नमूद केले.


मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेश पोलिसांना उद्देशून बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राष्ट्रविरोधी, समाजविरोधी आणि देश तोडण्याचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई आपण नेमकी कधी करणार आहात? की मग आम्ही हे स्पष्टपणे समजून घ्यावे की, या कृत्यांना आपले पूर्ण सहकार्य आहे आणि हे सर्व आपल्या संमतीने घडत आहे?”


या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




Tags

Post a Comment

0 Comments