वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
कोशिंबी केंद्राची आठवी शिक्षण परिषद स्व यशवंत शिवराम पाटील सभागृह जिल्हा परिषद शाळा भोकरी येथे शनिवार दिनांक 31.1.2026 रोजी संपन्न झाली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख शामराव पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती भिवंडी गटशिक्षणाधिकारी संजय असवले उपस्थित होते.
शिक्षण परिषदेची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार ग्रामपंचायत सरपंच प्रगती पाटील यांच्या हस्ते अर्पण करून व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात ईशस्तवन व स्वागत गीत गायन केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत जिल्हा परिषद भोकरी शाळेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल रवींद्र पोटे सर यांचा गटशिक्षणाधिकारी संजय असवले व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेतील नियोजित विषयांवर शिक्षकांनी अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले.
सदर शिक्षण परिषद ज्या सभागृहात संपन्न झाली ते सभागृह ग्रामस्थ प्रमोद पाटील आणि त्यांच्या पत्नी सरपंच प्रगती पाटील यांनी चार लाख रुपये खर्च करून अतिशय सुसज्ज व आकर्षक सभागृह जिल्हा परिषद शाळेला तयार करून दिले आहे. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शामराव पवार सर यांनी अथक परिश्रम घेतले. सदर सभागृहाची शिक्षकांकडून व ग्रामस्थांकडून स्तुती व कौतुक होत आहे.
तसेच सदर शाळेला उद्योजक जयदास पालवी यांनी 21 खुर्च्या, अजित ओरा यांनी संगणक सीसी कॅमेरे भेट दिली आहेत.
गटशिक्षणाधिकारी संजय असवले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कोशिंबी केंद्रातील शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे शैक्षणिक कार्य करत असून त्यांची कोणतीही तक्रार तालुक्याला कधीही प्राप्त होत नाही. आपण नेहमी सकारात्मक भूमिका ठेवून शैक्षणिक कार्य करत असले पाहिजे. तसेच सुसज्ज सभागृह पाहून ग्रामस्थांना धन्यवाद दिले व शिक्षकांचे कौतुक केले.
ग्रामस्थ प्रमोद पाटील यांनी गावातील विकास योजनांच्या बाबतीत माहिती दिली तसेच सदर सभागृह माझे वडील स्व. यशवंत शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी तयार करून दिले आहे त्याचा निश्चितच सर्व शैक्षणिक कार्यासाठी उपयोग होईल असे मला वाटते.
सर्व शिक्षकांची भोजनाची व्यवस्था ग्रामस्थ प्रमोद पाटील यांनी केली.
शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट शैलीने नेत्रा किल्लेदार तर आभार प्रदर्शन अशोक गायकवाड यांनी केले
सदर शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी भोकरी शाळेतील शिक्षक सूर्यवंशी सर, सावंत मॅडम व किल्लेदार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षण परिषदेसाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी संजय असवले, केंद्रप्रमुख शामराव पवार, सरपंच प्रगती पाटील, प्रमोद पाटील, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य अशोक गायकवाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक सोष्टे, माजी अध्यक्ष विनोद गोरले, सदस्य नम्रता गोरले, शिक्षण प्रेमी ओंकार गोरले, ग्रामस्थ प्रभाकर पडवळ, उद्योजक प्रमोद गोरले, उद्योजक उद्योजक जयदास पालवी , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments