Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मौजे कानवे येथे एक दिवशीय माघ पौर्णिमा अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर उत्साहात संपन्न

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

प्रतिनिधी-बाळकृष्ण सोनावणे

मौजे कानवे येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ठाणे जिल्हा व भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका महिला कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय माघ पौर्णिमा अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर यशस्वीपणे पार पडले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे व अंधश्रद्धांना मूठमाती देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शहापूर तालुका महिला अध्यक्षा आद. करुणाताई भडांगे यांची निवड करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून आद. शीलाताई तायडे (ठाणे जिल्हा अध्यक्षा), आद. महानंदाताई गायकवाड (संस्कार उपाध्यक्ष) व आद. विजयाताई दामोदर (संस्कार सचिव, प्रभारी शहापूर तालुका) उपस्थित होत्या.

या शिबिराचे आयोजन आयु. राजेश राऊत, श्रीमती रजनी राजेश राऊत, आयु. सिद्धार्थ राऊत, श्रीमती सीमा सिद्धार्थ राऊत, आयु. गजानन राऊत, श्रीमती नीता गजानन राऊत, आयु. राहुल राऊत व आयु. विजय राऊत यांनी केले होते. मान्यवरांच्या शुभहस्ते दीप, धूप व पुष्प अर्पण करून सामूहिक त्रिसरण-पंचशील व बुद्ध पूजेद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष आद. करुणाताई भडांगे यांनी केले. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्षा आद. शीलाताई तायडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर प्रभावी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. तथागत गौतम बुद्ध हे विज्ञानवादी होते व त्यांनी कोणत्याही चमत्कारांवर विश्वास ठेवला नाही, असे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आशाताई लिहीतकर, श्रीमती शैला केदारे, श्रीमती सुजाता केदारे, श्रीमती आशा गोतसुर्वे, श्रीमती रागिनी दिवान व श्रीमती शिवानी केदारे यांनी केले.

या शिबिरास आयु. किशोर चन्ने (पत्रकार), आयु. शंकर गायकवाड (ठाणे जिल्हा संपादक – वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज), आयु. बाळकृष्ण सोनावणे (प्रतिनिधी – वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज), आयु. सदानंद रातांबे (सामाजिक कार्यकर्ता) यांच्यासह श्रीमती स्वातीताई कांबळे, श्रीमती पूजाताई भोईर, श्रीमती करुणाताई घनगाव, श्रीमती मृणालताई भोईर, श्रीमती भारतीताई सोष्टे, श्रीमती सुजाताताई उबाळे, श्रीमती कविताताई इंगळे तसेच भारतीय बौद्ध महासभा कानवे शाखेतील महिला वर्ग, नातेवाईक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपानंतर आयोजकांच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनदान करण्यात आले व समाधानकारक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




Post a Comment

0 Comments