वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : आनंद भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळ तसेच कसारा शाखेच्या वतीने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असा उपक्रम राबविण्यात आला.
आज दिनांक 02 फेब्रुवारी 2026 रोजी आयु. बिन्नर सोमनाथ, सेवानिवृत्त मुख्य गाडी लिपीक, कल्याण यार्ड, रा. वीर संभाजी नगर, आसनगाव, ता. शहापूर, जि. ठाणे हे नेहमी आजारी असल्यामुळे त्यांना कल्याण ते आसनगाव असा प्रवास करणे अवघड होत होते. ही बाब लक्षात घेऊन त्यांचा फॅमिली पास आसनगाव स्टेशन मास्टर कार्यालयात देण्याचे काम यशस्वीरित्या करून देण्यात आले.
सेवानिवृत्त रेल्वे कामगारांची कामे करत असताना मुख्यालय तसेच मुंबई मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमी लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यामध्ये कॉ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ), कॉ. वसंत कासार (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, मुंबई मंडळ), कॉ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कसारा शाखा), कॉ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी, कसारा शाखा), कॉ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, कसारा शाखा) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच वेळोवेळी कॉ. आनंदा भालेराव, सचिव, मुंबई मंडळ यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे नमूद करण्यात आले.


Post a Comment
0 Comments