Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

अस्नोली येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

 


प्रतिनिधी-शंकर गायकवाड

आगस्त्या इंटरनॅशनल फॉउंडेशन व EdelGive फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, अस्नोली येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


या स्पर्धेत शहापूर व मुरबाड तालुक्यातील एकूण २५ शाळांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावरील सखोल ज्ञान, तर्कशक्ती आणि उपस्थिती बुद्धीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रम शैक्षणिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. जि. प. शाळा शेळवली (बां) हिने प्रथम क्रमांक पटकावला, जि. प. शाळा भुवन हिला द्वितीय तर जि. प. शाळा मुगाव हिला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व चषक प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.


कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रोग्राम लीडर हर्षद चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे इग्निटर अमोल चौधरी, रिंकू पडवल, हर्षला चौधरी, एकनाथ विशे, तेजस्विता माळी तसेच चालक दिनेश फर्डे व मोहन डोलस यांनी मोलाचे योगदान दिले.


कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.



Post a Comment

0 Comments