Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; ग्रामपंचायत सावरोली सो येथे अभिवादन.

 


प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

सावरोली सो : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत सावरोली सो येथे मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. देशभरात साजऱ्या होत असलेल्या जयंती उत्सवाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अगरबत्ती प्रज्वलित करून वातावरण भक्तिमय करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच श्री. मधुकर निरगुडा, उपसरपंच श्री. जयवंत दवणे, ग्रामसेविका राऊत मॅडम, गांगणवाडी अंगणवाडी सेविका पारधी मॅडम, ग्रामस्थ श्री. महेश हिंदोला, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण दवणे, सुखदेव निरगुडा तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज, ठाणे जिल्हा संपादक श्री. शंकर गायकवाड उपस्थित होते.

 शंकर गायकवाड यांनी आपल्या मनोगतात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकत युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. उपस्थित ग्रामस्थांनीही महाराजांच्या कार्याचा गौरव करत जयजयकार केला.


कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. संपूर्ण वातावरण ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमून गेले. 



Post a Comment

0 Comments