Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*07 दिवसात हल्लेखोरांना अटक न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक , नांदेड परिक्षेत्र ,नांदेड येथे 26 फेब्रुवारी 2026 रोजी धरणे आंदोलन* ...!

 


प्रतिनिधी -मोहन दिपके 

 कळमनुरी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे यांच्या जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.सदरील घटनेला 6 दिवस उलटले असून सुद्धा अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही, हि गांभीर्याची बाब आहे. सदरील घटना अज्ञात 03 व्यक्तीने घडून आणली असून पोलीस प्रशासनाकडून गेली 06 दिवसापासून हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही,या कारणास्तव आज पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन कळमनुरी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या 07 दिवसात आरोपींचा शोध घेऊन त्वरित अटक करून कडक कारवाई न केल्यास येत्या दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्र,नांदेड येथे धरणे आंदोलन करण्यात येईल,असे लेखी निवेदन देण्यात आले आहे.यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम,संतोष इंगोले

(युवा ता.महासचिव),जयभीम डोंगरे (युवा ता.सचिव),राष्ट्रपाल कोकरे

( युवा ता.उपाध्यक्ष),ज्येष्ठ यशवंत नरवाडे,भगवान ढेपे,किरण पाईकराव, उमाजी चोपडे,बाळासाहेब पाईकराव,काशिनाथ साळवे,करण नरवाडे,प्रवीण नरवाडे,सूर्या नरवाडे,माणिक पाईकराव,विजय जोंधळे,जितेश कदम,शेषराव पातोडे, गोविंद पाईकराव,किरण जोंधळे, प्रदीप नरवाडे, संदीप नरवाडे,कपिल नरवाडे, देवराव पाईकराव, केशव दांडेकर, प्रशांत नरवाडे, किरण पाईकराव, रामकिशन कांबळे, शिवाजी पाईकराव, सुनील खंदारे, सुनील खंडागळे, भीमराव पाईकराव,दिनेश पाईकराव, समाधान पाईकराव , ज्ञानाबा पाईकराव व इतर समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments