Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

अखिल हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एनआरएमयू कल्याण कोऑर्डिनेशनकडून भव्य रक्तदान शिबिर

प्रतिनिधी - आनंदा भालेराव 

कल्याण, दि. १९ फेब्रुवारी २०२६:

अखिल हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एनआरएमयू (NRMU) कल्याण कोऑर्डिनेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजहित आणि मानवसेवेचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला.


आज सकाळी १० वाजता कल्याण उपनगरीय गार्ड लॉबी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. हे पूजन काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.


यावेळी मुख्यालयाकडून काॅ. रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष), काॅ. अमित भगत (सहाय्यक महामंत्री), ARIPWF चे काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. अरुण मनोरे (कार्यकारी अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच कल्याण कोऑर्डिनेशनचे सेक्रेटरी काॅ. पनीकर, कल्याण शाखेचे अध्यक्ष काॅ. सुहास देशमुख, कसारा शाखेचे सचिव काॅ. अमित इंगळे, इंस्टिट्यूट सचिव काॅ. सतिशन, सेवानिवृत्त सहकारी काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कसारा शाखा), काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनाइज सेक्रेटरी, कसारा शाखा) आदी मान्यवर उपस्थित होते.


“सहयोग संकल्प ब्लडबँक, कल्याण” यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात रेल्वे कर्मचारी, सेवानिवृत्त सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजासाठी उपयुक्त असा हा सेवाभावी उपक्रम ठरला.


कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल एनआरएमयू कल्याण कोऑर्डिनेशनचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Post a Comment

0 Comments